समजून घेणारं हवं असतं...
एक अदृश्य अस्पष्ट जाळ विणलेलं
नाही कोणी आपल्याला समजून घेणारं
खरी समस्या दृश्य स्पष्ट कळणारी
समजून सांगता न येणं त्रास देणारं
अन समजून सांगितलेलं कळेल का
याची शाश्वती खरी शंका पेरणारी
खरंच वेड्या भ्रमात जगतं आपलं मन
सैरभैर धावणं फक्त एका आशेवर
समजूत काढणारं नि समजून घेणारं हवं
बोलकं होत जावं आपलं स्मित नकळत
होत राहतं अनोळखी अस्थिर निराशेत
अन दुरावत जातं न उमजता दृष्टिपल्याड
एक अदृश्य अस्पष्ट जाळ विणलेलं
नाही कोणी आपल्याला समजून घेणारं
खरी समस्या दृश्य स्पष्ट कळणारी
समजून सांगता न येणं त्रास देणारं
अन समजून सांगितलेलं कळेल का
याची शाश्वती खरी शंका पेरणारी
खरंच वेड्या भ्रमात जगतं आपलं मन
सैरभैर धावणं फक्त एका आशेवर
समजूत काढणारं नि समजून घेणारं हवं
बोलकं होत जावं आपलं स्मित नकळत
होत राहतं अनोळखी अस्थिर निराशेत
अन दुरावत जातं न उमजता दृष्टिपल्याड
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
©️वर्षा_शिदोरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा