मनातलं कागदावर.....'स्व'चा शोध
प्रत्येक गोष्टीचा अंत हा निश्चित असतो. जीवन असो किंवा नाटक. पात्र मनासारखे रंगवलेले असले तरीही अंतापर्यंतची लढाई म्हणा किंवा संघर्ष हा मनाजोगता कधी जगता येतो नाहीतर फक्त रंगीन झालेला साकारता येतो. म्हणून एक आस असते की अनेक पात्रांमधलं एक पात्र अंताशेवटी आपलं असावं, जे कोरलेल्या, पोखरलेल्या मनाला हळुवार फुंकर घालून हवं तसं समाधान देऊन जावं.
आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यापेक्षा ती गोष्ट कुठे संपवायची हे महत्वाचं असतं म्हणून अंताची आस म्हणा किंवा मनासारखं व्हावं अशी इच्छा आपलं मन राखून ठेवत असतं. अंत सकारात्मकतेने व्हावा एक अंतिम आस त्यात असतेच !
जीवन हा इतका विस्तृत प्रवास आहे कि त्याला एक प्ले/ड्रामा संबोधनं भले सोपं वाटतं पण संक्षिप्त(इन brief) वर्णन करायचं झालं तर एक आस किंवा इच्छा(wish) यांचा अपेक्षित नि सकारात्मक अंत शोधत राहणं एवढंच !
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
©️वर्षा_शिदोरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा