आंतरराष्ट्रीय पुरुष दिन २०१९ ची थिम:
"पुरुष आणि मुलांसाठी एक फरक आणणे"
'ती' आणि 'तो' फरक मात्र मिटता मिटत नाही
त्याच्याकडेही बापाची अफाट माया असते
त्याच्याकडेही आईचे काळजीवाहू अश्रू असतात
त्याच्याही हृदयात भाऊप्रेम उफाळून येतं
त्याच्याकडेही प्रेमाचं प्रेमळ अस्त्र असतं
त्याच्याही हृदयी अनेक गुपितं लपतात
त्याच्याकडेही आधाराचा खंबीर खांदा असतो
त्याच्यासारखा विश्वासू मनात घर करतो
त्याच्यापाशी काळीज पिळवटून टाकणारं
मोठं साहसी धाडसी मन असतं
त्याला अशांतीची, नराधमाची विशेषणं
एकाच्या चुकीची शिक्षा नसावी इतर कुणाला
पण 'ती' आणि 'तो' फरक मात्र मिटता मिटत नाही
एवढं एक दुर्दैव अंतर नि भेद वाढवणारं
आपल्या जीवनातल्या काळजी करणाऱ्या
नि आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
एकाच्या चुकीची शिक्षा नसावी इतर कुणाला
पण 'ती' आणि 'तो' फरक मात्र मिटता मिटत नाही
एवढं एक दुर्दैव अंतर नि भेद वाढवणारं
आपल्या जीवनातल्या काळजी करणाऱ्या
नि आपल्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येक पुरुषाला
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
©️वर्षा_शिदोरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा