पावसाचा आस्वाद हा बहुरंगी....!
सुंदरतेचं वर्णन करणं काहीसं अवघड असतं
कविमनाचा थांग लागणं काहीसं जिकिरीचं असतं
पण पावसाच्या थेंबांची सुंदरता कळणं आपलंसं असतं
पहिल्याच पावसाचं असणं काहीसं खास असतं
अनेकांच्या कहाण्या जपणारं रान असतं.....
कडाडणाऱ्या विजांचा, गडगडाट ढगांचा
मन खेळवून ठेवणारे काळेभोर आभाळ दाटलेले
आस्वाद चाखावा या पावसाच्या रडणाऱ्या आसवांचा
व्याकुळ झालेल्या डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा
पावसाच्या स्पर्शाने मोहक हसणारी धरणी काहीशी बघावी....
फुलावेलींचा कोमल कोंब फुटतो चोहीकडे
रानमाळावरचा दळवळ हिरवा गालिचाच जणू
सुगंधी मातीचा दुर्मिळ पदार्थ काहीसा ओळखीचा
वाहणाऱ्या पाण्याचा खळखळता आवाज घाली साद मना
भरलेल्या नदीनाल्यांचा शिरकाव पाण्याचा सगळीकडे.....
हातावरच्या थेंबांना प्रेमाने न्याहाळणे होई अनेकदा
गालावरच्या त्यांना अलगद गोंजारणं होई लगबगीने
चिखलमातीच्या अस्वच्छतेचा काय तो अभिमान वाटे
होड्यांच्या खेळातला आनंद जग जिंकल्यासारखा
मोराचा फुललेला पिसारा चकित करणारं हास्य.....
सुखात दिपवणारे आनंदी डोळे चकाकत्या ताऱ्यासारखे
थंडगार वाऱ्यासोबत मनमोकळ्या गप्पांचं रंगणं
साथीदाराला बिलगणं काहीसं लाजवणारं
ओल्याचिंब या जीवाला नवा गंध सुखावणारा
अन या पावसाच्या सरींना अलगद आपलंस करणं....
©️वर्षा_शिदोरे

पाऊस असतोच हा आठवणी चा आपुलकीचा आपल्यातील आपले पण शोधणारा
उत्तर द्याहटवाछान !
हटवाKhup chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद सुशांत !
हटवा👍👌☺️
उत्तर द्याहटवापावसाची सर आली की,
आपली आठवण त्याला असेल
त्याची आठवण आपल्याला असेल,
या साऱ्या अठवणींच मनात एक रान वसेल,
मागे वळून पाहता,
आसवांच्या सागरातून,
आनंदाचे असु दिसेल
छान !
हटवा