मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

कहाणीला कुठे असते ठाऊक
काय आहे पुढ्यात गोड की वाईट
ती लिहिणाऱ्याची मोहमाया
सुरुवात नि शेवट गुलदस्त्यात
समजून घेणारा कधी समजतो
तर कधी राहतो चाचपडत अर्ध्यात
  
 ©️वर्षा_शिदोरे 

४ टिप्पण्या:

  1. कहाणी ला नसतो अंत. कधी आनंद तर कधी दुःख. आयुष्याच्या शेवटी कळते अशी ही कहाणी असते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वेगवेगळ्या कहाणींतली पात्र वेगवेगळी
      या जीवनपटलावरच्या कहाण्यांत
      ती हमखास येतात जुळून
      जुळणारी असतात मने
      अन आणखी एक कहाणी सुरु
      सुख-दुःखाचा न चुकणारा फेरा फेरा
      पुन्हा घेतो कवेत माणसाला

      हटवा
  2. 👍👌☺️
    उमलनं आणि फूलनं
    यात बरेच अंतर असते
    उमलनं अगदी स्वाभाविक आहे
    फूलनं त्यानंतरच आहे

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. उमलणारी कळी असते
      तिला जपणारे आपण असतो
      अन तिच्या मोहक रुपाला
      सुंदर फुल होताना पाहणं
      आपलं सर्वात आनंदी होणं असतं...
      फुलाचा सुगंध आपल्यासारखा
      सर्वत्र दरवळत असतो.....

      हटवा