मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

प्रेम हे....वेड लावी जीवा !


रुसवा घालवणारे स्मितहास्य लाजवणारे
दोन प्रेमींच्या प्रेमबंधाचं अस्सल रूप बघावं
अशा दोघांच्या मनाला भावतो प्रेमाचा विडा
नखशिखांत वेड लावणाऱ्या त्या जीवांना
मोहित करे प्रेमाने गुंफलेल्या फुलांचा सुगंध

विचारांचं वेगळेपण जवळ आणणारं सारखेपण 
आकर्षणाच्या फेऱ्या चुकवून नतमस्तक प्रेमापुढे
भावनांचा कंठ फुटून अलगद उलगडे रहस्य
मायेची हक्काची कुशी जेव्हा गरज सांत्वनाची 
जन्मजन्मांतराच्या पलीकडचा प्रवास विश्वासाचा

नव्याचं नवंपण हरदिवशी टिकवणारं नातं
अटीतटीच्या परिस्थितीत जिद्दीने साथ देणारं पाऊल
मनावरचा भार हलका करणारं स्वच्छंदी ओझं
जीवात जीव असणारं प्रेमरूपी आयतंच ब्रह्मास्त्र
प्रतिक्षेच्या कटू घासातला सुखावणारा गोडवा

पाऊसवेड्या प्रेमींचा आनंद काय वर्णावा
सानिध्याचा मनमोकळा सहवास जवळचा
सहवासाचे क्षण जपणारी आठवणींची कुपी
एकमेकांसाठी धाव घेणारी ओढ न्यारी
निर्मळ मनावरचा पडदा भार नाही कधी

©️वर्षा_शिदोरे

२ टिप्पण्या:

  1. प्रेमाची सोबत असते खास. सगळे जग जरी असेल विरोधात.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जगाचं कुणी बघितलंय
      खरंच साथ की विरोधात
      पण खरं प्रेम काय
      समजलंय खरंच कुणाला

      त्याचे रंग अनेक...भावना एकच
      कधी दुरावा...कधी सोबत
      नकळत होत असेल आपलं
      पण असतोच ना मोठा पेच

      हटवा