बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९

प्रवास...

पहिलंवहिलं पाऊल
बालपण रेंगाळणारं

फावल्या वेळात रमणं
आवडीनिवडींचा श्वास

तारुण्याच्या उर्मीत
हरवलेलं शोधणं 

इच्छांची स्वप्नपूर्ती
दिपवणारं वैभव

स्वभावांचं जुळणं
सोबत आयुष्यभराची

सन्मानाने जगवणं
आदरतिथ्याचं बक्षीस

जीवनप्रवासाचा प्रवास
ज्याचा शेवट निरंतर  


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा