मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

जसजसा माणूस लहानाचा मोठा होत जातो
तसं त्याच्या हसण्यासोबत रडणंही अबोल होत जातं
डोळ्यातले अश्रू राग, संताप, द्वेष, अनादर....
असं सर्वच काही करतात प्रयत्न व्यक्त करण्याचा 
पण कठीण जातं दुसऱ्या कुणासमोर रडणं.....
आज....ते डोळ्यात दिसण्याआधीच जातात सुकून
अबोल असतात ना.....एकांतातचं होतात मोकळे 
कळत नसतं....पण प्रश्न अनेक असतात
नक्की कुणाच्या डोळ्यात असायला हवे होते ते…?
आपले अश्रू का फक्त पाणी होतं वाहणारं...? 
की होतं त्यामागे न सांगता येणारं
नि लपवण्यासारखं कारण काहीतरी....!



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा