गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९

मुक्तता नेमकी कशापासून हवी आहे..... 
स्वातंत्र्याचा पिंजरा कोणापासून हवाय मुक्त.....
मुक्तरूपी विचारांची पहाट......
स्वातंत्र्याची हवीये का सकाळ.....

जातपात, धर्म, वंश या बेड्यांनी जखडलेले हात....
उचनीचतेचा भेदभाव.....संपेल का कर्दनकाळ.....
माघार घेण्यास स्वतःपासून का नसावी सुरुवात.....
स्वतंत्र जगायला कुणाची हवीये साथ..... 

बंधुभावाचं मूल्य कमी पडतंय का भेदभाव मिटवण्यातं..... 
समुदायाचा पगडा शरीरावरचा मिटेलही कदाचित..... 
पण मनाला बसलेल्या चटक्यांचे काय.....

स्वातंत्र्य विचारांचं होण्याआधीच.....
आगमन विरोधाच्या ग्रहणाचं......
मात करणारी ज्योत तेवत अशीच.....

बोलणाऱ्याचा आवाज गिळणाऱ्याचा किती हो जागर.....
आवाजाचा कंठ फुटू पाहणाऱ्याचा मूर्त होतो श्वासच.....
न कळणाऱ्यांची भरतीच मोठी लाखो लोकांत......

अल्ला, भगवान समसमान.....कधी असेल समान समाज.....
डोळसपणे पुढ्यात नेहमीचा का अंधार......
स्वतःहून झाकलेला आशेचा चंद्र......
कशाला देईल प्रकाशाची साथ.....

आज ७३ वर्षाच्या आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने.....
मिळेल का एक नवी उम्मीद.....
जागर पुन्हा नव्या वाटांचा नि ध्येयाचा.....
घडेल का सुवर्णकाळ खऱ्या स्वातंत्र्याचा.....

७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!


(स्वलिखित-by self)

४ टिप्पण्या: