शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९

डोक्यातल्या कल्पना कागदावर उतरतच असतात
की अपयशाचे विचार सुन्न करून जातात सगळं
मग निरव शांततेचा घेरा या कल्पनांच्या ठिणगीला
शंकेचं वारूळ पुन्हा विळखा घालतं शत्रूसारखं
कुणास ठाऊक पुन्हा त्यांचं जोमानं होईल का आगमन
की राहून जाईल पुन्हा एकदा यशाच्या रांगेतून पुढं जाणं...
 
 
©️वर्षा_शिदोरे  

1 टिप्पणी: