शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०१९
डोक्यातल्या कल्पना कागदावर उतरतच असतात
की अपयशाचे विचार सुन्न करून जातात सगळं
मग निरव शांततेचा घेरा या कल्पनांच्या ठिणगीला
शंकेचं वारूळ पुन्हा विळखा घालतं शत्रूसारखं
कुणास ठाऊक पुन्हा त्यांचं जोमानं होईल का आगमन
की राहून जाईल पुन्हा एकदा यशाच्या रांगेतून पुढं जाणं...

©️वर्षा_शिदोरे
बुधवार, २८ ऑगस्ट, २०१९
प्रवास...
पहिलंवहिलं पाऊल
बालपण रेंगाळणारं
फावल्या वेळात रमणं
आवडीनिवडींचा श्वास
तारुण्याच्या उर्मीत
हरवलेलं शोधणं
इच्छांची स्वप्नपूर्ती
दिपवणारं वैभव
स्वभावांचं जुळणं
सोबत आयुष्यभराची
सन्मानाने जगवणं
आदरतिथ्याचं बक्षीस
जीवनप्रवासाचा प्रवास
ज्याचा शेवट निरंतर
पहिलंवहिलं पाऊल
बालपण रेंगाळणारं
फावल्या वेळात रमणं
आवडीनिवडींचा श्वास
तारुण्याच्या उर्मीत
हरवलेलं शोधणं
इच्छांची स्वप्नपूर्ती
दिपवणारं वैभव
स्वभावांचं जुळणं
सोबत आयुष्यभराची
सन्मानाने जगवणं
आदरतिथ्याचं बक्षीस
जीवनप्रवासाचा प्रवास
ज्याचा शेवट निरंतर
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
©️वर्षा_शिदोरे
दुखावलेल्या मनाला मायेची घालावी फुंकर
'जरा धीर धर' असं सांगावं कधी समजावून
धगधगत्या रागरूपी अग्नीचा दाह
क्षणात शमवावा प्रेमाने नि लडिवाळपणे
निराशतेच्या अनपेक्षित जखमेला
आपुलकीच्या मलमाने गोंजारावे कधी
(स्वलिखित-by self)'जरा धीर धर' असं सांगावं कधी समजावून
धगधगत्या रागरूपी अग्नीचा दाह
क्षणात शमवावा प्रेमाने नि लडिवाळपणे
निराशतेच्या अनपेक्षित जखमेला
आपुलकीच्या मलमाने गोंजारावे कधी
©️वर्षा_शिदोरे
सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९
स्वतःबद्दल विचार केल्याने
जर आपण खरंच स्वार्थी म्हणून गणलो गेलो असतो
तर सतत दुसऱ्याचा विचार करणारा
निस्वार्थीपणाचा मूर्तिकार झाला असता….!
त्याच्या महानतेचा पाढा न वाचताच
जग भरारी घेत राहिला असता....!
कधी स्वार्थी झालेलाही दुसऱ्याची मनःस्थिती
तितकीच निस्वार्थ भावनेने समजून घेतो....!
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
जर आपण खरंच स्वार्थी म्हणून गणलो गेलो असतो
तर सतत दुसऱ्याचा विचार करणारा
निस्वार्थीपणाचा मूर्तिकार झाला असता….!
त्याच्या महानतेचा पाढा न वाचताच
जग भरारी घेत राहिला असता....!
कधी स्वार्थी झालेलाही दुसऱ्याची मनःस्थिती
तितकीच निस्वार्थ भावनेने समजून घेतो....!
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९
नारळासारखं बाहेरून कठोर मुलामा असलेलं हृदय
अगदीच असतं आतल्या मलाईसारखं कोमल
ओठात वाणी कठोर पण बोलणं आपुलकीचं
त्यात कटू गुपितं सहजपणे लपतात
अगदीच असतं आतल्या मलाईसारखं कोमल
ओठात वाणी कठोर पण बोलणं आपुलकीचं
त्यात कटू गुपितं सहजपणे लपतात
ज्याची जाणीव नसते गुपित राखणाऱ्यालाही
सगळ्यांपासून लपवलेलं कारणासहित ठाऊक
ऐकणारं कुणी जवळ नसावं म्हणून नाही
तर ते न सांगणंच खरं गुपित असतं....!
सगळ्यांपासून लपवलेलं कारणासहित ठाऊक
ऐकणारं कुणी जवळ नसावं म्हणून नाही
तर ते न सांगणंच खरं गुपित असतं....!
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
©️वर्षा_शिदोरे
मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९
जसजसा माणूस लहानाचा मोठा होत जातो
तसं त्याच्या हसण्यासोबत रडणंही अबोल होत जातं
डोळ्यातले अश्रू राग, संताप, द्वेष, अनादर....
असं सर्वच काही करतात प्रयत्न व्यक्त करण्याचा
पण कठीण जातं दुसऱ्या कुणासमोर रडणं.....
आज....ते डोळ्यात दिसण्याआधीच जातात सुकून
अबोल असतात ना.....एकांतातचं होतात मोकळे
कळत नसतं....पण प्रश्न अनेक असतात
नक्की कुणाच्या डोळ्यात असायला हवे होते ते…?
आपले अश्रू का फक्त पाणी होतं वाहणारं...?
की होतं त्यामागे न सांगता येणारं
नि लपवण्यासारखं कारण काहीतरी....!

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०१९
रक्षण करणारा भाऊच असतो असेही नसते काही....
बहिणीची मायाही करत असते रक्षा भाऊप्रेमाची....
गर्दीत 'तो' सांभाळून घेतो 'ती'ला.....
आपल्या काळजाच्या तुकड्यासारखा....
त्याच्यावर चालून आलेला अपशब्दांचा रणगाडा....
'ती' खंबीरपणे रोखणारी आईच्या मायेसारखी.....
नातं कधी मित्रत्वाचं तर कधी वरचढ मोठेपणाचं....
खट्याळपण दडलेलं या संबंधात....
धाक दाखवणारा नात्यातला जडपणा नसतो कधी....
पण दूर होताना आठवणींचं उजाडपण.....
नातं आणखी करतं घट्ट.....
दोघा बहीण-भावाचं प्रेम एकमेकांवाचून अपूर्णच....!
अशा सर्व बहीण-भावांना रक्षाबंधनाच्या हार्दिक अनेक शुभेच्छा !!!

मुक्तता नेमकी कशापासून हवी आहे.....
स्वातंत्र्याचा पिंजरा कोणापासून हवाय मुक्त.....
मुक्तरूपी विचारांची पहाट......
स्वातंत्र्याची हवीये का सकाळ.....
जातपात, धर्म, वंश या बेड्यांनी जखडलेले हात....
उचनीचतेचा भेदभाव.....संपेल का कर्दनकाळ.....
माघार घेण्यास स्वतःपासून का नसावी सुरुवात.....
स्वतंत्र जगायला कुणाची हवीये साथ.....
बंधुभावाचं मूल्य कमी पडतंय का भेदभाव मिटवण्यातं.....
समुदायाचा पगडा शरीरावरचा मिटेलही कदाचित.....
पण मनाला बसलेल्या चटक्यांचे काय.....
स्वातंत्र्य विचारांचं होण्याआधीच.....
आगमन विरोधाच्या ग्रहणाचं......
मात करणारी ज्योत तेवत अशीच.....
बोलणाऱ्याचा आवाज गिळणाऱ्याचा किती हो जागर.....
आवाजाचा कंठ फुटू पाहणाऱ्याचा मूर्त होतो श्वासच.....
न कळणाऱ्यांची भरतीच मोठी लाखो लोकांत......
अल्ला, भगवान समसमान.....कधी असेल समान समाज.....
डोळसपणे पुढ्यात नेहमीचा का अंधार......
स्वतःहून झाकलेला आशेचा चंद्र......
कशाला देईल प्रकाशाची साथ.....
आज ७३ वर्षाच्या आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने.....
मिळेल का एक नवी उम्मीद.....
जागर पुन्हा नव्या वाटांचा नि ध्येयाचा.....
घडेल का सुवर्णकाळ खऱ्या स्वातंत्र्याचा.....
७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!!

सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९
शनिवार, १० ऑगस्ट, २०१९
'एव्हरग्रीन स्माईल' चं प्रेत्येकालाच नसतं वरदान
'फेक स्माईल' मागे खूप काही दडतं खुशाल
कसोटी तेव्हा असते जेव्हा ते ओळखणारे खूप
पण ओळखू शकणारा असतो 'समवन स्पेशल'
'फेक स्माईल' मागे खूप काही दडतं खुशाल
कसोटी तेव्हा असते जेव्हा ते ओळखणारे खूप
पण ओळखू शकणारा असतो 'समवन स्पेशल'
कधी हिरमोडही या 'फेक-रिअल' कसोटीत
मन कसं ओळखावं.....ज्याची ओळखच धूसर....!!!
मन कसं ओळखावं.....ज्याची ओळखच धूसर....!!!
(स्वलिखित-by self)
शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९
अक्सर ऐसा होता है......
ख्वाबों का पूरा होना अब एक ख़्वाब सा लगता है
दिल का धड़कना अब एक एहसास ही रह जाता है
ख़ुशियों का आना एक बरसों पुराने यादों का सन्नाटा सा लगता है
ख्वाबों का पूरा होना अब एक ख़्वाब सा लगता है
दिल का धड़कना अब एक एहसास ही रह जाता है
ख़ुशियों का आना एक बरसों पुराने यादों का सन्नाटा सा लगता है
अक्सर ऐसा होता है.....
चाहें भरोसा हो ना हो प्यार की ख्वाईश रह ही जाती है
दूरियाँ मिटाने की कोशिशें अक्सर और पास लाती है
कहानी चाहें किसी की भी हो ओ अपनी सी लगती है
चाहें भरोसा हो ना हो प्यार की ख्वाईश रह ही जाती है
दूरियाँ मिटाने की कोशिशें अक्सर और पास लाती है
कहानी चाहें किसी की भी हो ओ अपनी सी लगती है
(स्वलिखित-by self)
एक अनुभव कथन....
खालील अनुभव दोन-तीन वेळा आल्याने तो सहज म्हणून शेअर करत आहे....
महिला किंवा मुलगी म्हटलं की कमजोरपणाचा किंवा मदतीची गरज पडणारंच असा शिक्का कसा ठेवला जातो ते बघूयात !
मी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी लाईन मध्ये उभे होते. मला थोडा उशीर होत होता त्यामुळे मी गाडीची डिक्की उघडून तयारीतच होते. तिथल्या दादाने कितीचे करू असे विचारले असता मी १०० रुपयांची नोट दाखवून १०० रुपयाचे पेट्रोल टाक म्हणून सांगितले. त्याला स्पष्ट ऐकू जावे म्हणून हेल्मेटची काचही मी वरती केलेली होती. मार्किंग शून्यावर करून त्याने पाईप टाकीत टाकला. ३० रुपयांचे पेट्रोल टाकल्यावर त्याने पाईप बाजूला केला. मी लागलीच म्हटलं आणखी ७० चे करा, मी १०० चे करा असे सांगितले.
तसे त्याने ७० रिडींग आल्यावर पुन्हा पाईप काढून घेतला. आता माझ्यामागे २ गाड्या उभ्या होत्या. आधी मीच शेवटी होते.
त्याने कदाचित व्यवस्थित ऐकले नसावे म्ह्णून मी पुन्हा म्हणाले, "मी तुम्हाला १०० रुपयांचे टाका असे म्हणतेय तर तुम्ही पुन्हा ७० वरच येऊन थांबलात".
तो म्हणाला, "मॅडम बरोबर आहे. आधीचे ३० चे आणि आता ७० चे. झाले ना १०० !"
माझ्या मागचे आता त्याच्यावर ओरडायला लागले, "अरे किती वेळ ?"
माझ्या मागेच असलेले काका काहीतरी गडबड आहे या शंकेने आम्हां दोघांकडे बघून म्हणाले, "आवर रे.....रिडींग चुकीचे घेतोय का हा.....काय रे बघू का तुझ्याकडे ?"
"अरे, तू आधीच्या ३० पासूनच सुरुवात केली. शुन्यावर नव्हतेच रिडींग. म्हणजे अजून ३० चे नको का करायला", त्या काकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आता मी थोडे रागानेच म्हणाले.
पण खूपच वेळ झाल्यामुळे तसे मागचे लोक आणखीच कल्ला करू लागले.
मग मी नम्रपणे त्या काकांना म्हणाले, "थँक यू काका. पण काही हरकत नाही. आय कॅन हॅन्डल इट. थँक्स वन्स अगेन".
कदाचित त्या दादाने जाणूनबुजून केलेला उर्मटपणा त्याच्या अंगलट येईल आणि मीही माघार घ्यायला तयार नाही म्हटल्यावर तो म्हणाला, "हो, करतो मॅडम"
तरीही त्या काकांच्या मागच्या बाईकवर असलेल्या एका मुलाने त्या दादाकडे रागाने पाहिलेच आणि गुर्मीत म्हणाला, "आवरतो की नाही आता की होऊ पुढे ?"
तसे मी त्याच्याकडेही काहीसे रागानेच पाहिले. कारण मी आताच नम्रपणे केलेली विंनती त्याने ऐकून न ऐकल्यासारखी केली होती.
सांगायचा उद्देश इतकाच की, अन्याय, चुकीचे पायगंडे, मुद्दामहून घेतलेले आढेवेढे इत्यादींना तोंड द्यायला आम्हां स्त्रिया, मुलींनाही जमते. आम्हीही सक्षम आहोत आज. फक्त गरज आहे आमचा आवाज न दाबता किंवा बोलणं दुर्लक्षित न करता तो ऐकावा.

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९
रविवार, ४ ऑगस्ट, २०१९
कसं असतं ना जीवनाच्या पडद्यावर
अनेक व्यक्तिमत्वे भेटतात
ज्यांचं असणं नक्कीच असतं महत्वाचं
पण खास असे फक्त काहीच असतात
ज्यांना 'मित्र' म्हणतात.....!
'मित्रत्व' जपणारे ते जीवनाचे भाग होतात
नकळत पुन्हा पुन्हा 'खास' होतात
'Sharing is Caring' म्हणतात ना अगदी तसंच हे नातं
तिथे नसते जागा 'एक दिल दो जान' च्या वायफळ बडेजावाला
Jealousy....आपल्या खास असणाऱ्यांसाठी कुणी खास असण्याची
तिथे ते प्रेम असते पण understanding चे
बिनसतं तसं खूप काही....शेवटी प्रेमच असतं ते
पण उलगडा होतो misunderstandings चा अगदी थोडक्यात
नाराजी ही फक्त काही क्षणांची....it's ok वरच भागतं सगळं
नको असतं भांडण.....पण कधी होतं सहज
उगाच न पटणारं, न सांगणं नाही जमत कधी
मन मोकळं नाही केलं तर ओझं वाटतं कुणाचं असणं
मग फुटतात कधी रागाचे फुगे पण योग्य तिथेच
फुग्यातली हवा काही अशीच नसते रिकामी
तिलाही असते जोड काळजीची नि हक्क गाजवण्याची.....
काय असतं ना.....मैत्रीच्या नात्यातलं हेच असतं खासपण !

कुछ मेरे बारेमें ही सहीं.....
मुझे अकेला रेहना सबसें ज्यादा पसंद था
किताबें मेरे सबसे अच्छे और सच्चे दोस्त हुआ करते थे
पुराणी हो गई अब ये बातें.....
क्योंकि उन किताबोंके साथ-साथ नए रिश्ते जो मिले मुझे
'दोस्ती'.....बिलकुल मेरे किताबोंके ख्वाबों जैसी
किसने किसको चुना ये मायने नहीं रख़ता अब
दोस्ती कितनी गहरी.....ये जानना उतना ज़रूरी नहीं
जितना किसी दोस्त का जिंदगी में होना ही सुकून दे
जो बातें कभी घरवालोंसे नहीं होती
ओ मैं अपनी 'डायरी' से किया करतीं थी
पर जबसे दोस्तोंकी एन्ट्री हुई है
जो समझाते और समझते भी है
उनसें बात करना काफ़ी आसान हो गया है
तबसे उस डायरीमे दोस्तीके किस्से और
बिताये हुए लम्हें क़ैद होने लगे है
मानों जिंदगी के साथ-साथ उसे भी नई मंज़िल मिली हो
वैसे यादोंके पिटारे काफ़ी भरें पड़े है
कुछ और जुड़ते जानें है.....
उन यादोंको जीना भी है और समेटना भी
आख़री साँस तक का तो पता नहीं
पर आज के पल हमेशा यादगार रहें।
मेरे सारें दोस्तोंको friendship day की ढ़ेर साऱी शुभकामनाएं !

दोस्ती..........
ओ प्यार ही क्या जो ख़ुदको भुला ना दे
ओ ख़ुशी ही क्या जो अपनीसी ना लगे
ओ दोस्ती ही क्या जो खुदगर्ज़ ना हो
दोस्ती का ये रिश्ता सबसे ख़ास जो है
दोस्त का हर पैगाम सलाखोपे है
दोस्त.....तेरे लिए मेरी जान नहीं क़ीमती
मैं हमेंशा तेरे साथ रहूँ.....ये है ज़रूरी
खुदगर्ज़ होना कोई गुनाह नहीं
ओ तो सिखाता है जीना शान से
कोई याद करें या ना करें.....
ज़रूरत हो या ना हो किसीकी.....
हम है तेरे वास्ते.....तेरे हर रास्तें में
सर झुकानेकी ज़रूरत नहीं कभी
सर तो तेरे आगे हमेशा ऊँचा है
मेरी दीवानी मैं हूँ अगर
तुम भी कहाँ कम हो
देखों ख़ुद को आयनेमें.....मेरी नज़र से
क्या बवाल हो तुम.....
खुदगर्ज़ी भी उसकी मोहताज़ नहीं
तू ज़रूरत मेरी और में आदत तेरी
पर कोई शिक़ायत नहीं.....अगर रूठे कभी
क्या है ना.....दोस्ती की है
कोई लाइफटाइम कमिटमेंट नहीं.....
जो हर हाल में निभाया जाए
पर ग़लतीसे भी....भूल ना जाना कभी
ज़रूरत हो या आदत.....आसानीसे नहीं छूटती
कभी मुँह मोड़ना.....इतना भी ग़लत नहीं
पर तुम एक बार पुकारों.....दौड़े चलें आएंगे।
मैत्री दिन की शुभकामनाएं दोस्तों !!!

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९
खरं पाहिलं तर बाह्यरूपी सौंदर्य महत्वाचं वाटतं अनेकांना आणि भुरळही घालतं अनेकदा....ते कधी उघड नसेल व्यक्त केलं जात पण मनात कुठेतरी दडलेलं असतं. कधी आपल्याला वागण्या-बोलण्यातून जाणवतं. मग कोणतं सौंदर्य महत्वाचं मानावं-मनाचं जे हृदयाला साद घालतं ते की चेहऱ्यावरचं जे अगदीच असतं उघड....कसं बरं ठरवणार ?
व्यक्तिमत्व पेहरावाने खुलतं खरंच आहे हे ! पण पेहरावही आपल्या दिसण्या-वागण्याला साजेसा असावा लागतो, हे नव्यानं सांगायला नको.... ते म्हणतात ना....अंगापेक्षा बोंगा नसावा मोठा !
अंतर्मन शुद्ध असेल तर सभोवतालच्या वातावरणासोबत आपलं व्यक्तिमत्वही खुलतं. आपल्या मनावरचा चांगल्या-वाईट विचारांचा पगडा खूप मोठा आणि विस्तृत तसा. पण विचारांचं काय असतं, नसेल पटत तर झुगारून पुढे जाणंच योग्य ठरतं....फक्त आपला निर्णयही योग्य असू शकतो हा विश्वास कायम असणं महत्वाचं !
आपल्यासाठी आपलं अथवा दुसऱ्याचं कोणतं सौंदर्य का म्हणून महत्वाचं ते आपण आपलं ठरवावं. कुणी कितीही गाथा गायली, ब्रह्मज्ञान सांगितलं तरीही आपल्या विचारांचं योग्य-अयोग्य असणं शेवटी आपल्या मनाला लवकर पटतं....म्हणून कुणाचंच ऐकू नये असे मुळीच नाही....निर्णय घेण्याची योग्यता प्रत्येकात असते. ती वेळीच ओळखावी.आपला कोणता गुण कुठे आणि केव्हा वापरावा याचं ज्ञानही यातूनच मिळतं....'चरित्र' नावाचा ग्रंथ याच विचारांतून घडतो, फुलतो....!!!
(स्वलिखित -by self)

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१९
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/zip-zap-zoom-childlike/articleshow/70409741.cms
झिप झॅप झूम - बालकविता
पावसाचं गुपितनाट्य
पावसाचं गुपितनाट्य
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)