मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१९

स्पर्धेसाठी
प्रेमाची अक्षरे राज्यस्तरीय समूह आयोजित, नववर्षाच्या निम्मित.....
भव्यदिव्य राज्यस्तरीय झटपट बडबडगीत लेखन स्पर्धा
 

नवं साल कोरलं सरलं....

आठवणींच्या कुपीला हळुवार हेरलं
स्वप्नांच्या रात्रींना अलगद प्रेमाने गोंजारलं
रोमांचकारी पात्रांतून मन वेडं मोत्यांत गुंफलं
मनमोहक नात्यांना काहीसं अलगद बिलगलं
सुख दुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं
अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...!! धृव !!

शिंपल्यापरी अनेकविध शोधली मनं
ग्रहण जीवाला लागलं नकळत दुराव्याचं
डोळ्यातलं कोरडं पाणी सागरातुनी ओघळलं
मन वळवत पुन्हा पुन्हा नव्याने भरवलं 
सुख दुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं
अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...!! धृव !!

शुभाशुभ घोराचं जाळं हिंमतीनं विणलं
उन्हं-पावसासारखं नाटकी बंधन अतूट जपलं
भेटींचं अनमोल भांडार हर्षाने साठवलं
आव्हानांचं डगमगतं धनुष्य सहज पेललं
सुख दुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं
अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...!! धृव !!

हृदयातली स्पंदनं न्याहाळली हौशीनं
गुढ भुलवणारं साठवलं दाटीवाटीनं
अलिप्त मनाला सोईनुसार स्वतःचं चोरलं
जगणं ठश्यात उमटवलं स्वभावाचं लेणं देणं 
सुख दुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं
अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...!! धृव !!

साल बहुढंगी घालमेलीच्या डोहात पानावलं
गणित मांडतं झालं सुंदर हर एक दिवसाचं
तप कडू गोड बोचऱ्या गजबजलेल्या गल्ल्यांचं
नव्यानं सजवेल रूप मोहक साल आयुष्याचं 
सुख दुःखाच्या क्षणांचे साल सरलं सरलं
अंतरात खोलवर त्याला कोरलं कोरलं...!! धृव !!


 (स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा