मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

गुलाब....

काट्यांसोबतचं सुंदर रूप
मोहक रूपाचं गुलाबी फुल

रंगछटांचा रंगीबेरंगी सडा
मन वाचणाऱ्या प्रेमळ कळ्या

नात्यातल्या कोमल पाकळ्या
आनंदून जातात मनमोकळ्या

भावनांचा संवाद काहीसा बोलका
नकळत गोड हास्य फुलवणारा

सुगंधाचं सुद्धा होतं एक गाणं
संगीत गुलाबाचं फुलपाखरू वेडं

 
(स्वलिखित-by self) 
©️वर्षा_शिदोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा