शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

स्वप्नरंजित दिवस

निरभ्र ढगांआड दडलेला
आठवणींचा रंगीन कोपरा
हसतमुखाने समोर यावा
आनंदाचा पाऊस पडावा
अन खिन्न मनाला भिजवून
उल्हासदायी दिवस सरावा
आटोपत्या लगबगीसरशी 
सायंकाळचं प्रफुल्लित चित्त
त्राण मिटवून शुभ्र चंद्राआड
रंगीन स्वप्न नगरीत हरवावं


(स्वलिखित-by self) 
©️वर्षा_शिदोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा