सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९


अपूर्ण गोष्टींचं अप्रुक मोठं
गोष्टी पूर्ण करणं लक्ष्य
पण पूर्णत्वाचा हा प्रवास
मात्र कठीण पूर्ण करणं
आश्चर्याने कळत-नकळत
होत जातात अपूर्ण गोष्टी पूर्ण
अन पूर्ण गोष्टी मात्र वाटतात
शेवटपर्यत अपूर्णच..... 


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

२८ सप्टेंबर २०१९ रोजी गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिक आयोजित कवयित्री वर्षा शिदोरे यांचा "स्मितरहस्य" काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा पार पडला.....!!!





बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९

 पण आशेला जिंकायला हवं...

अंधुक तेवणारा आशेचा किरण
खूप उम्मीद देऊन गेला
पण अविश्वासाचा लागलेला सुरुंग
सगळं काही हिरावून गेला
उम्मीदेतला विश्वासू फोलपणा
पुन्हा नाउम्मीद करून गेला

पण आत्मविश्वासाने आशेला जिंकायला हवं...
उद्याच्या भविष्यासाठी प्रयत्नांची शर्थ
आता नव्याने लढवायला हवी
नाउम्मीदेत उम्मीद शोधायला हवी
नव्या उत्साहाची धगधगती वात
पुन्हा जोमाने पेटवायला हवी 



(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
वैसे...केहने को तो 
आँसू आखों मे है
पर रो तो दिल रहा है
ऐसा लगने लगा है...
लाख़ कोशिशों के बावज़ूद
बरसों पुराने ज़ख्म
अब गिले होने लगे है
ना चाहते हुए भी
हमारे अपने हमें
और हम अपनों को
अब रुलाने लगे है...


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे  

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

शायद इसिलिये ख़ामोश है हम...!
 
अंदर चाहें कितना भी हो दर्द
मुस्कुराने की कोशिशें जारी है
अंदर चाहें कितना भी हो गुस्सा
जुबान पे मीठी बोली हमेशा है
मतलब हम दोहरा स्वभाव के नहीं

इंसान ही इंसान को दर्द दे
ये ना मंजूर है...ना ग़वारा
गुस्से से ज्यादा क़दर तो हमें
हमारे अपनों और चाहनेवालोंकी है
शायद इसिलिये ख़ामोश है हम...!
 
 
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे   

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९

अखेर होणार...अटळच असतं !

शेवटाचा शेवट निश्चित असतो
फक्त प्रयत्न प्रामाणिक करायचा असतो
न चुकता तोच तो स्पष्ट-अस्पष्ट मार्ग 
पुन्हा पुन्हा धैर्याने अवलंबवायचा असतो
नव्यासोबत कधी जूनही जपायचं असतं
शेवटाचा शेवट सुखात हवा असतो
म्हणून न विसरता दुःख गिळायचं असतं
अखेर मुळीच टाळायची नसते
तर तिला हसून विदा करायचं असतं !

 (स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे   
सच में...हर किसी को नहीं मिल पाता ना
ख़ुद से ज्यादा कोई चाहनेवाला...
पर मज़बूरी से अच्छे तो उसूल ही सही है
हा....जरूर अधूरासा लगता होगा...
पर शायद अधूरा होना ग़लत नहीं होता
बस...अधूरे तो लफ्ज़ होते है...
जो बया करने का जरिया नहीं बन पाते 

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे   
चांगल्यात रोजचं काहीतरी नवीन मिसळणं... 
वाईटात रोजचं काहीतरी नवीन मागे उरणं...
दोघांची सांगड घालून पुन्हा नवीन जोडणं...
परिस्थितीचं उलट-सुलट होणं चालू राहणं....  
नवप्रवाहाचा सागर असाच भरत राहणं...
प्रवाही जगण्याचा वारसा सुरूच ठेवणं...
असं मार्गक्रमण करत आयुष्य उभं राहतं...


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे  

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

 समाधानी मनाला पुन्हा पुन्हा समाधान देणारं....
 
आयुष्याच्या या अखंड डायरीवर
कधी नुसत्याच रंगहीन रेघोट्या
तर कधी सुंदर क्षणांची रंगीन झालर
तर कधी नुसताच शब्दांचा प्रवास
तर कधी शब्दहीन आसवांचा पाऊस
उत्कंठेच्या खाईत कोरं अपूर्ण स्वप्न
मात्र पंख त्याला याच कोऱ्या आशेचे

डायरीचं प्रत्येक पान वेगवेगळं रंगवलेलं
तरीही असतं प्रवासातलं आपलंसं असलेलं
योग्य-अयोग्याचं ठिकाण अजून न सापडलेलं
चांगल्या-वाईटाला फक्त एक जागा मिळालेली
त्यांना सामोरं जाणारी अशी स्वप्नांची वाट
अपूर्णतेच्या पंखांना बळ देता येणारं अवकाश
शोधावं लागतं आपलं आपल्यालाच

त्या पानांवरची शाई पुसून जाईपर्यंत 

असतात ते जिवंत शब्द....पानावर साचलेले
पण ते पुसले तरीही मनावरचं दडपण नसतं पुसत
म्हणून शोधावं लागतं असं काहीतरी साधन
जे मनाला घालू शकेल समाधानाचे पांघरून
डायरीवरचं न पुसता जगायचं खरं करण्यासाठी
समाधानी मनाला पुन्हा पुन्हा समाधान देणारं....

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे  

शनिवार, १४ सप्टेंबर, २०१९

सहनशक्तीलाही कधी झुकवावी लागते मान
कुणाच्या निर्धारापुढे तर कुणाच्या जिद्दीपुढे
द्वेष, तिरस्कार अशा शब्दांचे घाव न भरणारे
जखम दिसत नसली तरीही मन पोखरणारे
डोळ्यात पाणी नसले तरीही रडवणारे

नमते घेणे म्हणजे हार नसतेच नेहमी
इतरांना खुश ठेवण्याचा असतो एक प्रयत्न
तरीही नेहमीच नसते गप्प राहता येत
कधी होतो उद्रेक या गुण-अवगुणांचा 
तेही व्यक्त होण्याचं साधनच शेवटी.....!

©️वर्षा_शिदोरे 
आहे का विश्वास ?....हा प्रश्नच मुळात अविश्वासू
समोरच्याच्या या प्रश्नाला उत्तर देणं जरा कठीण असलं
तरीही त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवतांना
नवा अविश्वासी प्रश्न मात्र डोकं वर काढतो 
आपल्याच विश्वासावर त्याचा विश्वास नसेल तर...?
विश्वास-अविश्वासाच्या या चक्रव्यूहावर 
शेवटी प्रशचिन्ह न लावलेलंच बरं...!

©️वर्षा_शिदोरे


बड़ी फुरसत से लिखा होगा उपरवालेने
हमारा नाम अपनी डिक्शनरी में
दुःख-दर्द की कोई कमी नहीं यहाँ
पर फ़िर भी उम्मीदोंकी पूरी बारात यहाँ
कोई और हमसे जरूर दूर हो जाए 
पर हम फ़िर भी डटे हुए....सपनोंके पीछे
राहोंके काटे ख़ुद ही निकाल फ़ेक रहे है
हमारी हिम्मत हार मान
जाए ये हमे मंजूर नहीं
तभी तो....बड़ी फुरसत से लाया है हमे ख़ुदा ने
जिसे शायद....हमसे भी ज्यादा भरोसा है हमपे

©️वर्षा_शिदोरे
कुणाची साथ हवीशी असेलही कधी
पण केव्हा....हेही तितकंच महत्वाचं 
गरज नेमकी कुणाची कुणाला
हे मुळीच नसतं ठरवायचं आधी
ते कुणा दुसऱ्याची साथ देता देता
आपोआप ज्याचं त्याला कळत जातं....

©️वर्षा_शिदोरे  

शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९

कधी कधी सहज पडतो विचारी प्रश्न
कासवासारखा मंद गतीने चाललेला जीवनप्रवास
खरंच असतो का साहसी....जो नक्कीच होईल यशस्वी
की असते फसवणारी चाल....जी चुकवते आपली वाट
शर्यतीतला वेगाने धावणारा ससाच पोहचवतो का
इच्छित स्थळी....की आपलाच नडतो धुर्तपणा

©️वर्षा_शिदोरे  
एका दिवसाची किंमत.....

एका दिवसाची किंमत कळते तेव्हा
जेव्हा त्याने असते साथ सोडलेली
अपेक्षांच्या ओझ्याखाली जगतांना
कधी चुकत असतं जगायचं गणित
पण म्हणून दिवसाचं नसतं थांबत चक्र 
  
खरं तर नसतंच माहिती कुणाला
उद्याचा दिवस काय ठेवणार पुढ्यात
पण एक मात्र असतं निश्चित ध्येय
येणारा दिवस असतो जगायचा
नुसताच नाही घालवायचा रडत रडत


©️वर्षा_शिदोरे  

कधी एकटं वाटणं....नसावी मात्र एक भावना
गरज असावी बहुदा आपल्या माणसांच्या असण्याची 
सहज मिळणारी साथ योग्यच असेही नाही काही 
पण असावं कोणीतरी....ज्याला न सांगताच कळावं
नातं कोणतंही असेल पण विश्वास असावा प्रबळ
प्रेम नसेल तरीही खास जागा असावी हक्काची
शेवटी एकांताचा एकांतवास न घडावा कधी....


©️वर्षा_शिदोरे  


हो...खरं आहे हे......
हसणं अन रडणं जमतं सगळ्यांनाच
मनाशी बेभान लपंडाव खेळता खेळता
भावनांचा उद्रेक असाच नसतो विनाकारण  
कुणाचं रडणं आतल्याआत तळमळत राहण्यात
मनाशी चालतो खेळ सतत....न संपणारा
कुणाचं हसणं मनमोकळं....न लपणारं
सगळ्यांसोबत मोकळं वावरणं

हो...खरं आहे हे......
हसणं-रडणं मुळात खेळच भावनांचा
स्वप्न जगतांना दोघांचंही सोबत वावरणं
कधी आशा अंधारी तर कधी भरारी उत्तुंग
असं शिखर गाठता गाठता सगळेच थकतात
पण आरशात बघावं प्रतिबिंब हसतांना
अश्रूंना मोकळी वाट करून द्यावी रडतांना  
भावना असो कोणतीही खेळ नसावा स्वतःशी


©️वर्षा_शिदोरे
मूर्तीच शेवटी भावनांची.....

अनेक गोष्टींना बेधडक तोंड देत असलो
तरीही मूर्तीच आहे भावनांची शेवटी
अनेक भावनांचं मिश्रण....कधी न उमजणारं 
कोरलेले काहीही असू देत शिल्परुपी हृदयावर 
कुठल्या कोपऱ्यात काय दडलंय
अवघड जात असतं स्वतःलाच शोधणं
भीतीची सावली पुन्हा पुन्हा मागे खेचणारी
पण नेहमीच असतो प्रयत्न समाधानी असण्याचा
सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नांत
स्वतःला नसतं जमत विसरणं....हरवणं 
इथेच तर असते ना....खरी अग्निपरीक्षा
त्यात कोण जळत जाईल आणि कोण उरेल
भविष्याच्या घरात दडलेलं सगळं काही
शेवटी मूर्तीच ना भावनांत गुरफटलेली....


 
©️वर्षा_शिदोरे  

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

सोन्यासारखं शुद्ध मन असलेल्याला
परिसस्पर्शाची काय म्हणून गरज
त्याचा स्वभावच खरा चकाकता दागिना
चालढालीचा पेहराव शुद्धतेचा नमुना
विचारधारेचं तत्व आदर्शवादी व्यक्तिमत्व !


©️वर्षा_शिदोरे  
आठवणी......

कधी लपवत असतो आपण
दुःख वरवरच्या फसव्या हास्यामागे
मानगुटीवर बसलेल्या दुःखाला
नसते द्यायचे पोहचू हृदयापर्यंत
तिथं ते कायमचं राहतं साठून....!

स्मरणात राहणं करतं 
अधिक पोकळ 
दुखावणाऱ्या आठवणी असतात विसरायच्या
फसव्या हास्याच्या खऱ्या पडद्यामागे
आठवणी....अलगद हास्य उमटवणाऱ्या
साठवून ठेवायच्या असतात कायमच्या....! 


©️वर्षा_शिदोरे 

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

कहाणीला कुठे असते ठाऊक
काय आहे पुढ्यात गोड की वाईट
ती लिहिणाऱ्याची मोहमाया
सुरुवात नि शेवट गुलदस्त्यात
समजून घेणारा कधी समजतो
तर कधी राहतो चाचपडत अर्ध्यात
  
 ©️वर्षा_शिदोरे 
प्रेम हे....वेड लावी जीवा !


रुसवा घालवणारे स्मितहास्य लाजवणारे
दोन प्रेमींच्या प्रेमबंधाचं अस्सल रूप बघावं
अशा दोघांच्या मनाला भावतो प्रेमाचा विडा
नखशिखांत वेड लावणाऱ्या त्या जीवांना
मोहित करे प्रेमाने गुंफलेल्या फुलांचा सुगंध

विचारांचं वेगळेपण जवळ आणणारं सारखेपण 
आकर्षणाच्या फेऱ्या चुकवून नतमस्तक प्रेमापुढे
भावनांचा कंठ फुटून अलगद उलगडे रहस्य
मायेची हक्काची कुशी जेव्हा गरज सांत्वनाची 
जन्मजन्मांतराच्या पलीकडचा प्रवास विश्वासाचा

नव्याचं नवंपण हरदिवशी टिकवणारं नातं
अटीतटीच्या परिस्थितीत जिद्दीने साथ देणारं पाऊल
मनावरचा भार हलका करणारं स्वच्छंदी ओझं
जीवात जीव असणारं प्रेमरूपी आयतंच ब्रह्मास्त्र
प्रतिक्षेच्या कटू घासातला सुखावणारा गोडवा

पाऊसवेड्या प्रेमींचा आनंद काय वर्णावा
सानिध्याचा मनमोकळा सहवास जवळचा
सहवासाचे क्षण जपणारी आठवणींची कुपी
एकमेकांसाठी धाव घेणारी ओढ न्यारी
निर्मळ मनावरचा पडदा भार नाही कधी

©️वर्षा_शिदोरे
पावसाचा आस्वाद हा बहुरंगी....!


सुंदरतेचं वर्णन करणं काहीसं अवघड असतं
कविमनाचा थांग लागणं काहीसं जिकिरीचं असतं
पण पावसाच्या थेंबांची सुंदरता कळणं आपलंसं असतं
पहिल्याच पावसाचं असणं काहीसं खास असतं
अनेकांच्या कहाण्या जपणारं रान असतं.....

कडाडणाऱ्या विजांचा, गडगडाट ढगांचा
मन खेळवून ठेवणारे काळेभोर आभाळ दाटलेले
आस्वाद चाखावा या पावसाच्या रडणाऱ्या आसवांचा
व्याकुळ झालेल्या डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा
पावसाच्या स्पर्शाने मोहक हसणारी धरणी काहीशी बघावी....

फुलावेलींचा कोमल कोंब फुटतो चोहीकडे
रानमाळावरचा दळवळ हिरवा गालिचाच जणू
सुगंधी मातीचा दुर्मिळ पदार्थ काहीसा ओळखीचा
वाहणाऱ्या पाण्याचा खळखळता आवाज घाली साद मना
भरलेल्या नदीनाल्यांचा शिरकाव पाण्याचा सगळीकडे.....

हातावरच्या थेंबांना प्रेमाने न्याहाळणे होई अनेकदा
गालावरच्या त्यांना अलगद गोंजारणं होई लगबगीने
चिखलमातीच्या अस्वच्छतेचा काय तो अभिमान वाटे
होड्यांच्या खेळातला आनंद जग जिंकल्यासारखा
मोराचा फुललेला पिसारा चकित करणारं हास्य.....

सुखात दिपवणारे आनंदी डोळे चकाकत्या ताऱ्यासारखे
थंडगार वाऱ्यासोबत मनमोकळ्या गप्पांचं रंगणं
साथीदाराला बिलगणं काहीसं लाजवणारं
ओल्याचिंब या जीवाला नवा गंध सुखावणारा
अन या पावसाच्या सरींना अलगद आपलंस करणं....

©️वर्षा_शिदोरे