सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

पान आपट्याचे सोनरूपी स्थान
सोन्यासारख्या माणसांचे जपते मन

श्रद्धेचा गोंधळ फक्त पानात नाही
विश्वासाचं रोप धाटामाटाने उभे

सजावटीचा घाट मोठ्या धाटणीचा
मनोमनी प्रेमळ आदरभाव सजलेला 

वाईटाचा व्हावा बिमोड सर्वनाश
चांगल्याला मिळावी प्रकाश वाट

दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृध्दी
अशीच नांदो सर्वांच्या जीवनात नेहमी

विजयादशमीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा