गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

कटू सत्य जगण्यातले

मनात दाटून आलेल्या असंख्य भावनांचा
नुसताच थैमान बेभान निसटत्या इच्छांचा
धडपडत सावरणाऱ्या एकट्या जीवाला
कोण कसे सांगेल कटू सत्य जगण्यातले

प्रकाशमय दिवा सुद्धा
राहतो तेवत सतत  
अंधाऱ्या प्रकाशाचा अंधार निरंतर मिटवत
सावरणाऱ्या श्वासाची ओढ जळण्यात धैर्याने
मिटवणारे मिटवतात आपापल्या परि स्वार्थाने

वेड्या ध्यासापायी लढतात काही वेड्यांनिशी
संघर्षाचं देणं मिटवेल असंच अंधार प्रकाशाने
भावनांच्या कल्लोळात जगावा श्वास मोकळा
दाटलेल्या भावनांचा झेलावा वार निसटता  


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

1 टिप्पणी: