Revolution(क्रांती)
क्रांतीचा संबंध नकारात्मक किंवा वाईटाशी असला तरीही त्याचा खोलवर विचार करून सकारात्मकतेकडे वाटचाल करता येते. क्रांती म्हणजे 'इन्स्टंट' उद्रेक असतो पण तोच आपल्या विवेकाला जागा करतो. कधी विकृत वाटलेली विचारसरणी पुढचे अपेक्षित ध्येय गाठण्यास मार्ग बनते.
उदाहरणार्थ, अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती यांसारख्या राज्यक्रांतींचा थोड्याबहुत फरकाने इतर अनेक राष्ट्रांच्या निर्मितींवर किंवा विकासावर नकारात्मकच नव्हे तर सकारात्मकही परिणाम झाला.
उदाहरणार्थ, भारताची राज्यघटना: सरनामा, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य इत्यादी.
Evolution(उत्क्रांती)
उत्क्रांतीची सुरुवात अपेक्षित क्रमाक्रमाने, टप्प्यानिशी होत असली तरी नेहमीच सकारात्मकतेकडे घेऊन जाईल याची शाश्वती देणे कठीण आहे.
उदाहरणार्थ, मानव उत्क्रांती टिपिकल प्राणी समजल्या जाणाऱ्या प्राण्यापासून मनुष्यरूप अशी टप्प्याटप्प्याने झाली. परंतु काही परिस्थिती पाहता आज एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा शत्रू म्हणून प्रण्यापेक्षाही घातक प्राणी आहे.
परिस्थितीतील 'बदल' एकूणच सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींवर अवलंबून असतो. ज्याचा संबंध भूत वर्तमान आणि भविष्य अशा सर्वच काळांशी येतो.
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा