अंत मात्र भयानक उभा पुढ्यात...
कुणाच्या आयुष्यात सहज येणं असतं सोपं
कुणाला सहज आपलं बनवणं होऊन जातं
आनंद मिळवण्यात नि देण्यात कमवलेलं
एका चुकेनिशी नाहीसं असतं झालेलं
कधी दुखावलेल्या मनाचं ओझं भार बनतं
तेव्हा ते सोपं की अवघड असं कळत जातं
नकळत झालेला हा सहवास चुकत गेला
की गरज अजून काही साधायची होती
चुकांचं ओझं घेऊन असंच भार वाहत राहावं
की स्वल्पविरामाला पूर्णविरामाची द्यावी जोड
आता कोणत्या क्षणाला कोसावं पेच मोठा असा
सुरुवात असो कशीही अंत मात्र भयानक उभा
कुणाच्या आयुष्यात सहज येणं असतं सोपं
कुणाला सहज आपलं बनवणं होऊन जातं
आनंद मिळवण्यात नि देण्यात कमवलेलं
एका चुकेनिशी नाहीसं असतं झालेलं
कधी दुखावलेल्या मनाचं ओझं भार बनतं
तेव्हा ते सोपं की अवघड असं कळत जातं
नकळत झालेला हा सहवास चुकत गेला
की गरज अजून काही साधायची होती
चुकांचं ओझं घेऊन असंच भार वाहत राहावं
की स्वल्पविरामाला पूर्णविरामाची द्यावी जोड
आता कोणत्या क्षणाला कोसावं पेच मोठा असा
सुरुवात असो कशीही अंत मात्र भयानक उभा
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा