शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

अंत मनाजोगता रंगवणारा
 
नाराज असलेल्या मनाला
हवं थोडंसं ठोस समाधान
पण सुटत चाललेल्या आशेला
हवी साथ सहानुभूतीची
स्वतःच लिहिलेल्या नाटकातली
पात्र मनासारखी रचलेली
नाही मात्र ओळखीची फक्त
दुभंगलेल्या या नाटकी मनाला
हवा अंत मनाजोगता रंगवणारा 


 (स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा