गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

कटू सत्य जगण्यातले

मनात दाटून आलेल्या असंख्य भावनांचा
नुसताच थैमान बेभान निसटत्या इच्छांचा
धडपडत सावरणाऱ्या एकट्या जीवाला
कोण कसे सांगेल कटू सत्य जगण्यातले

प्रकाशमय दिवा सुद्धा
राहतो तेवत सतत  
अंधाऱ्या प्रकाशाचा अंधार निरंतर मिटवत
सावरणाऱ्या श्वासाची ओढ जळण्यात धैर्याने
मिटवणारे मिटवतात आपापल्या परि स्वार्थाने

वेड्या ध्यासापायी लढतात काही वेड्यांनिशी
संघर्षाचं देणं मिटवेल असंच अंधार प्रकाशाने
भावनांच्या कल्लोळात जगावा श्वास मोकळा
दाटलेल्या भावनांचा झेलावा वार निसटता  


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

सोमवार, २८ ऑक्टोबर, २०१९

नात्यातला गुंता ओझं नाही दडलेलं
साथ निखळत्या दर्याची जणू साठवण
ओझरत्या प्रेमळ आठवणींच्या ओढीची

अनमोल रत्नांची दोन मानके शोभिवंत
क्षणोक्षणीच्या उसळत्या निसटत्या हुंदक्यात
माया आपुलकीची मनात दाटलेली शोधातं

बहीण-भावाच्या प्रेमाचा आला भाऊबीज सण
उत्सुक साठवायला ताज्या मायेचा ओलावा 
रुसव्या-फुगव्याची धडपड सहज विसरायला

भाऊबीजच्या सर्व बहीण-भावांना
खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!!


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे


गवसला नव्याने पुन्हा एकदा

दिसतं कधी कधी न वाचलेलं
स्वतःच्या बंद डोळ्यापल्याड
स्वतः जगलेलं झोप उडवणारं
स्वतःला मनोमन मिठी मारणारं
स्वप्नवेडं जगणं असं स्वप्नवत झालं

विसर ज्याचा ध्येयवेड्या मनातून
चालता चालता हळूच मागे सरलेला
वळून पाहता कोड्यात पाडणारा
उरलेल्या आशेनिशी जिद्दीने उभा
पुन्हा नवा सूर स्वतःत मिसळणारा

आत्मविश्वास हळूच डोकावणारा
सोबत पुन्हा पुन्हा सुगंधित करणारा
रस्ता कधी काळी जणू चुकलेला 
'मी'पणा नजरचुकीनं कवेत घेणारा
आज गवसला नव्याने पुन्हा एकदा 


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

मिला दे ख़ुद को ख़ुद से....

चाहें कैसे भी मिला हो ये दर्द
छुपाना शायद मुश्किल होगा
पर ये तो दिल की दास्ता है
समझ सको तो समझ लेना 
और फुरसत से आजमा लेना
जो कभी मिटाये नहीं मिटती
ढूंढोगे तो कभी मिल भी पाओगे

फासले चाहे कितने भी हो
चाहते हमेशा जिन्दा रहती है
परखो गे हज़ार बार तुम अगर 
पर वक़्त का साया डटा रहेगा
कभी ना
मिटा पायेगा इस दर्द को
बस छुप जायेगा अपने ही साये में 
जो कभी मिला दे ख़ुद को ख़ुद से 


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

उटण्याचा गंध उल्हासदायी पहाट
फराळाचा सुगंध उत्साही सुरुवात

मंगलमय पर्वाची दिवाळी स्नेहाची
आनंददायी जिवाभावाची दीपावली

दिवाळीचा सण दीपोत्सव रोषणाईचा
नात्यागोत्यातला गोडवा आगळावेगळा 

सुख-दुःखाची साथ निखळ हास्याची
समाधानी घरा अवघा आसमंत उजळी 

दिवाळीच्या भरभरून प्रेमळ, आनंदी, उत्साही, 
तेजोमय, प्रगतदायी, आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा !!!


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

 पुन्हा नव्याने सुरुवात.....

अवघड असतं खरं
पुन्हा नव्याने सुरुवात करणं
कोडं असतं सतावणारं
ज्याचं उत्तर अनोखं शोधायचं
सुरुवात ते शेवट मधलं अंतर
मात्र सतत झुलवत ठेवणारं
आशा-आकांक्षेचं वादळ
मोठा डोंगर अनिश्चिततेचा

वाट शोधणारं अवघड कोडं
नव्याने मांडणारी हिंमत स्वप्नाची
पुन्हा पुन्हा किरण आशेचा
नव ध्येयात नव्याने शोधायचा
नव्या पहाटेचं नवं रोपटं
नव्याने वाढवायचं नि जगायचं 
लक्ष्य पूर्णतेचा डोंगर निश्चयाने
असाच जोमाने सरायचा


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
आज धनत्रयोदशी.... 
या मंगल दिवसाच्या आपणास मंगलमयी शुभेच्छा !!!
धनासारख्या धनवान मनाच्या सहवासीयांचा आपणास सदैव सहवास लाभो !!!

आज वसुबारस.... 
उदारता लाभलेल्या आपणास उदार दिलदार शुभेच्छा !!!
गाई-वासरांठायीची प्रसन्नता, उदारता, माया, प्रेमभाव आपल्या ठायी अशीच नांदो !!!


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९

दुःख...सुख...स्वप्न...ध्येय...नि मंदिर...
 
दुःख आपलं मंदिराच्या सुंदर कळसासारखं असावं
जो महत्वाचा, शोभेचा असतो पण पाया मात्र नसतो 
ज्याचा मान असतो पण भक्कम आधार मात्र नसतो

सुख आपलं मंदिराच्या मोठया गाभाऱ्यासारखं असावं
जो क्वचित प्रेमाने फुलतो पण अवजड मात्र नसतो 
ज्याचा सन्मान असतो पण अवमान मात्र नसतो

स्वप्न आपलं मंदिराच्या मोहक मूर्तीप्रमाणे असावं
जी दिसायला गोजरी असते पण अविश्वासी मात्र नसते
जिचा थाट बोलका असतो पण प्राण मात्र मुका नसतो

ध्येय आपलं मंदिराच्या भिन्न पायऱ्यांप्रमाणे असावं
ज्या असंख्य असतात पण अर्थहीन मात्र नाही
ज्यांचा मार्ग कठीण असतो पण अशक्य मात्र नसतो 


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

स्वसिद्धतेची परीक्षा....इच्छा

स्वतःला सिद्ध करण्याची परीक्षा 
अनपेक्षित जीवघेणी फार
अंत पाहणारे निष्ठुर क्षण 
निरंतर खेळवत राहणारे 
ओझं नसेल वाटत तरीही 
तणावाची जाणीव सततची
विसावणारा खडतर प्रवास
 एकांत कधी न मिटवणारा
अंधारातूनी निश्चयी वाटचाल 
पूर्णत्वाची जणू परिकल्पना
दूरदृष्टीला व्यापक दृष्टिकोनाची 
उस्फूर्त विश्वासू मिळावी साथ 
स्वसिद्धतेची स्वप्नपरी इच्छा 
एकदातरी व्हावी पूर्ण


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
इंसान के भावनाओंकी कैफ़ियत.......

किसी इंसान को इतनी समझने की कोशिश ना करो
की ओ ख़ुद को ही ना समझ सके

किसी इंसान को इतना ना परख़ो
की ओ ख़ुद के इम्तिहान बार बार लेता रहे

किसी इंसान से इतनी शिकायतें ना करो
की ओ ख़ुद पे ही शक़ करने लगे

किसी इंसान का इतना ना मज़ाक बनाओ
की ओ ख़ुद का ही एक दिन तमाशा बनाये

किसी इंसान की इतनी फ़िक्र ना करो
की ओ तुम पे पूरी तरह आश्रित हो जाये

किसी इंसान पे इतने सवाल ना उठाओ
की ओ सवाल करना ही भूल जाये

किसी इंसान के सामने इतना ना झुक जाओ
की ओ ना ख़ुद को ना ही तुम्हें अहमियत दे सके

इंसान की ये भावनाएं दब जाती है कभी
ऐसी की उनकी कैफ़ियत कभी कोई सुन ना पाए


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

ये वक़्त भी गुज़र जाएगा....

गुस्सा दिमाग़ में भरा पड़ा
और दर्द सिने में दबा था
ये वक़्त भी गुज़र जाएगा
नम आखों का कहना था
बस दिल और दिमाग़ को
लड़ने से कैसे भी रोकना था
था मुश्क़िल पर करना था
किसी के नाराजगी का
बोझ यूँ ही सहते रहना 
अब दर्दनाक हादसा था
ये वक़्त भी गुज़र जाएगा
नम आखों का कहना था


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे


शब्दरूपी अश्रू.... 

शब्द जेव्हा अश्रू बनून ओघळतात
तेव्हा गालावर साचलेल्या पाण्यातला
खारटपणा समुद्रापेक्षाही असतो खारट
त्यात भावनांचा उद्रेक ओकांत करणारा
पण कानापर्यंत शब्द पोहोचण्याआधीच
त्यांच्यातला फोलपणा मात्र निष्क्रिय झालेला
शब्दांच्या ताकदीसमोर अश्रूंचं दृश्य दुःख
अदृश्य शब्दांत कधीच विरून गेलेलं
उरलेली मनातली खंत अजून दुखावणारी
मात्र खारट अश्रूंची साथ केव्हाच सोडलेली
 

(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

Revolution(क्रांती)
क्रांतीचा संबंध नकारात्मक किंवा वाईटाशी असला तरीही त्याचा खोलवर विचार करून सकारात्मकतेकडे वाटचाल करता येते. क्रांती म्हणजे 'इन्स्टंट' उद्रेक असतो पण तोच आपल्या विवेकाला जागा करतो. कधी विकृत वाटलेली विचारसरणी पुढचे अपेक्षित ध्येय गाठण्यास मार्ग बनते.
उदाहरणार्थ, अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती यांसारख्या राज्यक्रांतींचा थोड्याबहुत फरकाने इतर अनेक राष्ट्रांच्या निर्मितींवर किंवा विकासावर नकारात्मकच नव्हे तर सकारात्मकही परिणाम झाला.
उदाहरणार्थ, भारताची राज्यघटना: सरनामा, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य इत्यादी.

Evolution(उत्क्रांती)
उत्क्रांतीची सुरुवात अपेक्षित क्रमाक्रमाने, टप्प्यानिशी होत असली तरी नेहमीच सकारात्मकतेकडे घेऊन जाईल याची शाश्वती देणे कठीण आहे.
उदाहरणार्थ, मानव उत्क्रांती टिपिकल प्राणी समजल्या जाणाऱ्या प्राण्यापासून मनुष्यरूप अशी टप्प्याटप्प्याने झाली. परंतु काही परिस्थिती पाहता आज एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा शत्रू म्हणून प्रण्यापेक्षाही घातक प्राणी आहे.

परिस्थितीतील 'बदल' एकूणच सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींवर अवलंबून असतो. ज्याचा संबंध भूत वर्तमान आणि भविष्य अशा सर्वच काळांशी येतो.


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

अंत मनाजोगता रंगवणारा
 
नाराज असलेल्या मनाला
हवं थोडंसं ठोस समाधान
पण सुटत चाललेल्या आशेला
हवी साथ सहानुभूतीची
स्वतःच लिहिलेल्या नाटकातली
पात्र मनासारखी रचलेली
नाही मात्र ओळखीची फक्त
दुभंगलेल्या या नाटकी मनाला
हवा अंत मनाजोगता रंगवणारा 


 (स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
ख़ुद से ख़ामोशी है.... 
 
नाराज़गी की सौ वज़ह थी
पर मुस्कान बस अपना
नाम लेने से ही आ जाती थी
मनाने के सौ तरीक़े ढूंढे थे
पर दिल से ख़ुश रहने की 
बस एक वज़ह काफ़ी थी

अब सब ख़ामोश सा है
 ख़ुद से बातें कम होने लगी है  
किसी औऱ से बातों का
सिलसिला बढ़ रहा है
पर कुछ कमी सी है
शायद ख़ुद के एहसास की

कुछ समय ख़ुद से गुमशुदा क्या रहें
मानो ख़ुद से ही जुदा हो गए 
शायद अब कुछ एहसास
अभी भी जिन्दा है हम में 
ख़ुद की अहमियत किसी और में
ढूंढना अब जरुरी नहीं ....


 (स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
'स्मितरहस्य' काव्यसंग्रह हायलाईट्स....



सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

पान आपट्याचे सोनरूपी स्थान
सोन्यासारख्या माणसांचे जपते मन

श्रद्धेचा गोंधळ फक्त पानात नाही
विश्वासाचं रोप धाटामाटाने उभे

सजावटीचा घाट मोठ्या धाटणीचा
मनोमनी प्रेमळ आदरभाव सजलेला 

वाईटाचा व्हावा बिमोड सर्वनाश
चांगल्याला मिळावी प्रकाश वाट

दसऱ्याच्या शुभ दिनी सुख, समृध्दी
अशीच नांदो सर्वांच्या जीवनात नेहमी

विजयादशमीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !!!


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

निश्चयाची परीक्षा....

डोक्यात विचार असतात अनेक 
मनातलं मात्र नाही कळत सहज 

 
अमान्य गोष्टींचं नकळत समोर येणं
गोंधळलेल्या मनाला नाही होत सहन  

परखडपणे बोलणं नसेल रुचत कुणाला
म्हणून मन मनोमनी होत राहते दुःखी


निष्पाप मनाचा त्रास घेतो विनाकारण 
दृढ निश्चयाची परीक्षा परत परत 


 (स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
अंत मात्र भयानक उभा पुढ्यात...

कुणाच्या आयुष्यात सहज येणं असतं सोपं
कुणाला सहज आपलं बनवणं होऊन जातं

आनंद मिळवण्यात नि देण्यात कमवलेलं
एका चुकेनिशी नाहीसं असतं झालेलं

कधी दुखावलेल्या मनाचं ओझं भार बनतं
तेव्हा ते सोपं की अवघड असं कळत जातं

नकळत झालेला हा सहवास चुकत गेला
की गरज अजून काही साधायची होती

चुकांचं ओझं घेऊन असंच भार वाहत राहावं
की स्वल्पविरामाला पूर्णविरामाची द्यावी जोड

आता कोणत्या क्षणाला कोसावं पेच मोठा असा
सुरुवात असो कशीही अंत मात्र भयानक उभा


(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे

गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

आनंदाच्या या रानवनात...

पावसाच्या सरींसोबत
हळूहळू स्वतःला हरवणं
किती अनोखं असतं ना
ते पाऊस प्रेम नि
आपलं सोबत रेंगाळणं

अनेक आठवणींना
उजाळा देणारे क्षण
नकळत झेपावतात नि
आसवांचा सागर मिटवून
आनंदाचं रान वसवतात

वेगवेगळ्या नात्याला
बहर वेगवेगळा
नवखं असलेलं विश्व 
पुन्हा पुन्हा सामावतं
आनंदाच्या या रानवनात
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे 

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१९

वेळोवेळी परिस्थितीचं गणित 
स्वतःहून लागतं बेहिशोबी मांडावं
आपल्या आजच्या जगण्याचा हिशोब
लिहिते
नव्याने उद्याची नवी पहाट 
आयुष्याचा निश्चित ठावठिकाणा
ठावे नाही कुणाला कधी भेटेल जनाला
तरीही चालूच राहतं निरंतर शोधणं 
हित-अहिताचं सुनिश्चित स्थिरावणं
त्रासदायक मोठं कोंडीत सापडणं
शेवटी घ्यावा लागतो शोध स्वतः
सुखकर शेवटाचा ध्यास उराशी
अंधाऱ्या वाटेला प्रकाशित करणारं
नि दुःखातही वाट शोधणारं संचित
Never give up....
Nothing stays forever...
You know na.....!
 
 
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे