५ जून...जागतिक पर्यावरण दिन विशेष ललित लेख
पर्यावरण रक्षक...
मानवनिर्मित प्रदूषणाची काय ती भलीमोठी जंगले, वादळे, प्लास्टिक पॅच, महासागरातले जाळे, वितळलेल्या बर्फाचे उघड दालन, अग्नीच्या ज्वाला ज्यांच्यासमोर मनुष्याच्या प्रगतीचे पुराणही फिके ! हवामान बदलांचे हे जाळे ऋतुमानही हिरावून घेत आहे. पण पाहायला गेले तर आभासी जगतातले निसर्ग माणसाचे खरे जीवन झालेय. खुल्या आकाशाखाली त्याचे घर आहे पण खुले मन नाही, त्याचे दुःख उघड आहे पण सुख नाही, त्याच्या ठायी चिंता आहे पण आनंदी जीवन नाही.
तेव्हा पर्यावरणाच्या ह्रासाचे कारण होण्यापेक्षा त्याचे रक्षक व्हावे, त्याचे भक्षक होण्यापेक्षा त्याचे संवर्धनकर्ते व्हावे. प्रदूषणाची मात्रा कमी करण्याचा प्रयत्न करावा, वृक्षारोपण करावे, प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासुन करावी, उजाड धरतीला शाश्वत भविष्यासाठी, पिढीसाठी सुशोभित करावे.
“व्हावे रक्षक, नको उगा भक्षक
स्वतःच्या उपजीविकेचा सन्मान
सर्वांना खरंच हवी असल्यास
निरोगी पर्यावरणाची साथ छान”
परोपकाराच्या नावाखाली कित्येकदा लुटले स्वतःचेच अस्तित्व. कधी नकळत, कधी
निःस्वार्थाच्या खोट्या मथळ्यांखाली. विकास नि प्रगती नांदता घरी जणू
पर्यावरणाची रयाच गेली ! निसर्गाच्या शानशौकतीला इतके छेद केले की आज रक्षक
भक्षक झालाय असे म्हणायला निर्विवाद दाद मिळेल.
कुठे ती नैसर्गिक हिरवळ नि आता दारातल्या बागेतली कृत्रिम ‘लॉन’. आरोग्यदायी जीवनासाठी वैज्ञानिक उपाय करता करता नैसर्गिक जंगले, पर्वत, धरतीचे रूप, वृक्ष नवलाई, नदी, नाले, समुद्र इत्यादींनाच जणू महामारीने झपाटले आहे.
कुठे ती नैसर्गिक हिरवळ नि आता दारातल्या बागेतली कृत्रिम ‘लॉन’. आरोग्यदायी जीवनासाठी वैज्ञानिक उपाय करता करता नैसर्गिक जंगले, पर्वत, धरतीचे रूप, वृक्ष नवलाई, नदी, नाले, समुद्र इत्यादींनाच जणू महामारीने झपाटले आहे.
मानवनिर्मित प्रदूषणाची काय ती भलीमोठी जंगले, वादळे, प्लास्टिक पॅच, महासागरातले जाळे, वितळलेल्या बर्फाचे उघड दालन, अग्नीच्या ज्वाला ज्यांच्यासमोर मनुष्याच्या प्रगतीचे पुराणही फिके ! हवामान बदलांचे हे जाळे ऋतुमानही हिरावून घेत आहे. पण पाहायला गेले तर आभासी जगतातले निसर्ग माणसाचे खरे जीवन झालेय. खुल्या आकाशाखाली त्याचे घर आहे पण खुले मन नाही, त्याचे दुःख उघड आहे पण सुख नाही, त्याच्या ठायी चिंता आहे पण आनंदी जीवन नाही.
तेव्हा पर्यावरणाच्या ह्रासाचे कारण होण्यापेक्षा त्याचे रक्षक व्हावे, त्याचे भक्षक होण्यापेक्षा त्याचे संवर्धनकर्ते व्हावे. प्रदूषणाची मात्रा कमी करण्याचा प्रयत्न करावा, वृक्षारोपण करावे, प्रत्येकाने सुरुवात स्वतःपासुन करावी, उजाड धरतीला शाश्वत भविष्यासाठी, पिढीसाठी सुशोभित करावे.
“व्हावे रक्षक, नको उगा भक्षक
स्वतःच्या उपजीविकेचा सन्मान
सर्वांना खरंच हवी असल्यास
निरोगी पर्यावरणाची साथ छान”
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
नाशिक, नाशिक जिल्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा