क्षणभंगुर असतात काही गोष्टी, काही क्षण, काही आठवणी, काही प्रश्न नि काही
उत्तरं... जीवन जगायचे तर काहीतरी तोडगा काढावा लागतो. क्षणभंगुर क्षणांना
जगण्याच्या गणितात गुंफावं लागतं...!
क्षणभंगुर...
क्षणभंगुर असाव्यात वेदना
पण कोणत्या ?
जणू अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न
एक दीर्घ श्वास घेऊन
स्वतःशीच केलेला...
नकळत येऊ घातलेल्या
की स्वतःच स्वीकारलेल्या
की अनुत्तरित राहिलेल्या
की प्रश्नात गुंतलेल्या
की कधी न जाणवलेल्या
की फक्त शंकेतल्या
की खरंच क्षणभंगुर ???
उत्तराखातर उभे ठाकलेले
नवे प्रश्नच प्रश्नावलीतले...
विलक्षण क्षणांची
क्षणात चाळणी करणारे...
क्षणभंगुर क्षणांच्या
असंख्य वेदनांचे घाव
गुंतलेल्या मनाशी खेळ करत
सळसळत्या भावनांत
खोल रुतून बसलेले
क्षणिक वाटणारे...
कधीतरी शोधावे लागते
अन् साधावे लागते गणित
रडत, कुथत हरवलेले
प्रश्न वेदनादायी उत्तरातले
निसटलेल्या भावनांतले
शेवटी फक्त जगण्यासाठी...
क्षणभंगुर...
क्षणभंगुर असाव्यात वेदना
पण कोणत्या ?
जणू अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न
एक दीर्घ श्वास घेऊन
स्वतःशीच केलेला...
नकळत येऊ घातलेल्या
की स्वतःच स्वीकारलेल्या
की अनुत्तरित राहिलेल्या
की प्रश्नात गुंतलेल्या
की कधी न जाणवलेल्या
की फक्त शंकेतल्या
की खरंच क्षणभंगुर ???
उत्तराखातर उभे ठाकलेले
नवे प्रश्नच प्रश्नावलीतले...
विलक्षण क्षणांची
क्षणात चाळणी करणारे...
क्षणभंगुर क्षणांच्या
असंख्य वेदनांचे घाव
गुंतलेल्या मनाशी खेळ करत
सळसळत्या भावनांत
खोल रुतून बसलेले
क्षणिक वाटणारे...
कधीतरी शोधावे लागते
अन् साधावे लागते गणित
रडत, कुथत हरवलेले
प्रश्न वेदनादायी उत्तरातले
निसटलेल्या भावनांतले
शेवटी फक्त जगण्यासाठी...
(स्वलिखित-by self)
©️वर्षा_शिदोरे
नाशिक, नाशिक जिल्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा